TEACHER-1
देव आहे का?
इयत्ता पाचवी मध्ये प्राचीन इतिहास आहे. प्राचीन इतिहासामध्ये माणूस कसा घडला (उत्क्रांती) याबद्दल माहिती दिली आहे. त्यामध्ये मानवाची निर्मिती माकडासारक्या प्राण्यापासून झाली असे इतिहास सांगतो. मुलांना जेव्हा मी तो इतिहास शिकवत होतो तेव्हा एका मुलाने विचारलेला प्रश्न आहे जो आज मी तुम्हाला विचारतो, उत्तर मिळाले तर नक्की कळवा.:- (विनोद अ. आंबी)प्रश्न:- तर त्याने मला असं विचारलं की सर तुम्ही म्हणता की माणसांची निर्मिती माकडासारक्या प्राण्यामध्ये उत्क्रांती होत झाली आहे. आणि पुस्तकातल्या चित्रामध्ये अंगावर कपडे नसलेला, नंतर जनावराची कातडी अंगावर गुंडाळलेला माणूस दाखवलेला आहे. आणि आमच्या घरी किंवा सगळीकडेच अस म्हणतात की माणसाच्या आधी देव होते आणि माणसाला देवाने बनवलं. जर खरोखर माणसाला देवाने बनवलं असेल आणि तो पुस्तकातल्या सारखा होता तर फोटोतल्या देवाच्या अंगावर कपडे, दागिने कसेकाय? आणि जर देव तसा होताच तर मग माणसाला त्याने डायरेक्ट आपल्यासारखा का बनवला नाही, माकडासारखा का बनवला?
माझा प्रश्न:- माणसानं देव बनविला की देवाण माणूस?
No comments:
Post a Comment